scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरराजकारणनायडू सरकारवर आंध्रप्रदेश पोलिसांकडून कारवाईचा बडगा

नायडू सरकारवर आंध्रप्रदेश पोलिसांकडून कारवाईचा बडगा

वायएसआरसीपी प्रमुखांचा दावा आहे आंध्रप्रदेश पोलिसांकडून 680 नोटिसा जारी करण्यात आल्या असून पक्ष समर्थकांवर 147 खटले दाखल केले आहेत आणि 49 जणांना अटक झाली आहे. आंध्रप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना धमक्या आणि शिवीगाळ यांचा सामना करावा लागत आहे.

हैदराबाद: आंध्र प्रदेश पोलीस, राज्यातील चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नेतृत्वाखाली, अनेक सोशल मीडिया कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाशी संबंधित असलेल्या सहानुभूतीधारकांवर-युवजना श्रमिका रयथू काँग्रेस पार्टीविषयी अपमानास्पद पोस्ट केल्याबद्दल कारवाई करत आहेत.

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी या कृतीला “लोकशाहीवरील आक्रमण” आणि “विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न” म्हटले आहे. वायएसआरसीपी प्रमुखांच्या मते, 12 नोव्हेंबरपर्यंत, गेल्या काही दिवसांत 147 प्रकरणे नोंदवण्यात आली आणि 49 जणांना अटक करण्यात आली असून राज्यभरात त्यांच्या पक्षकारांना आणि समर्थकांना 680 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांना त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी बुधवारी नोटीस देण्यात आली असून त्यांना 19 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. प्रकाशम जिल्हा पोलिसांनी एका स्थानिक तेलगू देसम पक्षाच्या नेत्याच्या तक्रारीवर कारवाई केली आहे. वर्मा यांनी या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या चित्रपटाची जाहिरात करताना, जनसेना पक्षाचे प्रमुख नायडू, त्यांचा मुलगा पवन कल्याण, टीडीपी नेते नारा लोकेश आणि त्यांची पत्नी नारा ब्राह्मणी यांच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्मांचा चित्रपट व्यूहम आणि त्याचा सिक्वेल चित्रपट शपथम हे दोन्ही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.   निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जगन यांची  प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करताना त्यांनी नायडू, लोकेश आणि टीडीपी यांना लक्ष्य केले होते.

“आमच्या माहितीनुसार, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 41-अ अंतर्गत, गेल्या एक आठवडाभरात 67 नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये 39 जणांना अटक करण्यात आली आहे, ”मंगलागिरी पोलीस मुख्यालयातील उच्च अधिकाऱ्यांनी द प्रिंटला सांगितले.

उपमुख्यमंत्री कल्याण यांनी टीका केली होती, की महिलांवरील गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिस बेफिकीर राहिल्यास आणि सोशल मीडियावर वायएसआरसीपीने सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केल्यास त्यांनाच गृहखाते ताब्यात घ्यावे लागेल. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून 5 नोव्हेंबर रोजी वंगालपुडी अनिथा यांनी जाहीर केले होते की, विभागाला “अशा घटकांवर नियंत्रण आणण्यासाठी सोशल मीडिया ट्रोलच्या विरोधात कठोरपणे कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत”.

“सोशल मीडियावर अपमानास्पद मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. कारवाई झालीच पाहिजे,” असे वंगलापुडी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, की कल्याण यांचा त्रास त्या समजू शकतात कारण त्यांनीही या ‘ट्रोलधाडी’चा सामना केलेला आहे.

“एकाने कल्याण यांच्या मुलींवर बलात्कार करण्याची धमकी दिली, एकजण भुवनेश्वरी यांच्याबद्दल  (मुख्यमंत्री नायडू यांच्या पत्नी) असभ्य बोलला,  दुसरा लोकेश-ब्राह्मणींबद्दल अपमानास्पद टिप्पणी करतो. तर काहींनी मला, गृहमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर सामूहिक हल्ला आहे. अशा गुन्हेगारांवर कारवाई करू नये का? वंगालपुडी म्हणाल्या. वायएसआरसीपी प्रमुखांना “अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हणून सुधारात्मक कृतीचा चुकीचा अर्थ लावू नका किंवा चुकीचे वर्णन करू नका” असे त्यांनी सांगितले.

वायएसआरसीपीच्या अशा पहिल्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांपैकी एक ज्यांचा पोलिसांनी पाठलाग केला तो वररा रवींद्र रेड्डी, ज्यांच्यावर नायडू, लोकेश, कल्याण, वंगालपुडी, आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख वाय.एस. यांच्यावर असभ्य टीका केल्याचा आरोप आहे. विशेषतः वायएसआरसीपीच्या राजवटीत आणि निवडणुकीदरम्यान आंध्रप्रदेश काँग्रेस प्रमुख शर्मिला आणि त्यांची चुलत बहीण डॉ सुनिता नरेड्डी यांच्यावर अश्लील टिप्पणी पोस्ट केल्याचा आरोप आहे.

शर्मिला आणि सुनीथा, जगनची बहीण आणि चुलत बहीण, मार्च 2019 च्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भावाच्या विरोधात गेले आणि त्यांच्यावर वाय.एस.च्या हत्येतील कटकारस्थानांची बाजू घेतल्याचा आरोप केला. वायएसआर कुटुंबाचे घर असलेल्या पुलिवेंदुला येथील वरा ही जगनची पत्नी वाय.एस. भारती यांचे स्वीय सहाय्यक आणि कडप्पा येथील वायएसआरसीपी खासदार अविनाश रेड्डी यांच्या जवळचे आहेत.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments