scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरजग64% अमेरिकन अजूनही ख्रिश्चन, 70% लोकांचा मृत्युपश्चात जीवनावर विश्वास: 'प्यू'चे सर्वेक्षण

64% अमेरिकन अजूनही ख्रिश्चन, 70% लोकांचा मृत्युपश्चात जीवनावर विश्वास: ‘प्यू’चे सर्वेक्षण

79% अमेरिकन लोक नैसर्गिक जगाच्या पलीकडे असलेल्या आध्यात्मिक शक्तीवर विश्वास ठेवतात, तर फक्त 33% लोक दरमहा धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात. 2007 पासून दररोजच्या प्रार्थनेत घट झाली आहे, असे प्यूच्या बुधवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

नवी दिल्ली: प्यू रिसर्च सेंटरने बुधवारी प्रकाशित केलेल्या 2023-24 च्या धार्मिक लँडस्केप अभ्यासानुसार, वर्षानुवर्षे घट झाल्यानंतरही, ख्रिश्चन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकन लोकांचे प्रमाण 60 ते 64 टक्क्यांच्या दरम्यान स्थिर होत असल्याचे दिसून येते. अभ्यासाचा एक भाग म्हणून 36,908 अमेरिकन लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

धार्मिक धारणा आणि विश्वासांचा अभ्यास म्हणजे ‘प्यू’ने केलेले सर्वात व्यापक सर्वेक्षण आहे. हे अमेरिकेतील धार्मिक गटांच्या आकाराबद्दलची माहिती प्रदान करते. ही अशी माहिती आहे, जी अमेरिकन जनगणनेद्वारे गोळा केली जात नाही. गेल्या 17 वर्षांत प्यूने अशी तीन सर्वेक्षणे केली आहेत. 2007 पासून लोकसंख्येमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक दोघांचेही प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, असे अभ्यासात आढळून आले आहे. अमेरिकेतील ख्रिश्चनांचा सर्वात मोठा उपसमूह प्रोटेस्टंट आहे, जो अमेरिकन प्रौढांपैकी 40 टक्के आहे, तर कॅथोलिकांचा वाटा 19 टक्के आहे. ग्रीक आणि रशियन ऑर्थोडॉक्स चर्च, चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्स आणि यहोवाच्या साक्षीदारांसह इतर ख्रिश्चन पंथांशी ओळख पटवणारे लोक, हे अमेरिकन प्रौढांपैकी तीन टक्के आहेत.

अभ्यासानुसार, ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांशी संलग्न असणाऱ्या अमेरिकन लोकांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. आज, 1.7 टक्के अमेरिकन प्रौढ ज्यू म्हणून ओळखले जातात. 1.2 टक्के लोक मुस्लिम म्हणून ओळखले जातात. 1.1 टक्के लोक बौद्ध आहेत आणि 0.9 टक्के लोक हिंदू आहेत.

बहुसंख्य अमेरिकन आध्यात्मिक आणि अलौकिक शक्तींवर विश्वास ठेवतात. 79 टक्के लोकांचा असा विश्वास आहे, की नैसर्गिक जगाच्या पलीकडे काहीतरी ‘आध्यात्मिक’ आहे, जरी ते कोणी पाहू शकत नसले तरीही. 70 टक्के लोक मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवतात. नरक, स्वर्ग किंवा दोन्ही अस्तिवात आहे, अशी त्यांची धारणा आहे. 2021 पासून दररोज प्रार्थना करणाऱ्या अमेरिकन लोकांची टक्केवारी सातत्याने 44 ते 46 टक्क्यांच्या दरम्यान राहिली आहे. 2007 पासून त्यात लक्षणीय घट झाली आहे, असे या अभ्यासात म्हटले आहे. दरमहा धार्मिक सेवांना उपस्थित राहणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण सातत्याने कमी 30 टक्क्यांच्या श्रेणीत राहिले आहे. 33 टक्के अमेरिकन प्रौढांनी महिन्यातून किमान एकदा धार्मिक सेवांना उपस्थित राहण्याची नोंद केली आहे.

18 ते 24 वर्षे वयोगटातील तरुण प्रौढ 74 आणि त्यावरील वयस्कर प्रौढांपेक्षा खूपच कमी धार्मिक आहेत.धर्माशी लिंग संलग्नतेवर आधारित तुलना करताना असे आढळून आले की महिलांमध्ये धार्मिक संलग्नता, श्रद्धा आणि प्रथा पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते – दररोज प्रार्थना करणाऱ्या महिला आणि पुरुषांच्या संख्येत 13 टक्के फरक आहे. 2007 च्या सर्वेक्षणात नोंदवलेल्या 17 टक्के गुणांपेक्षा हे थोडे कमी आहे. या अभ्यासात संगोपन आणि व्यक्तीची सध्याची धार्मिक ओळख, श्रद्धा आणि प्रथा यांच्यातील मजबूत संबंध देखील अधोरेखित केला आहे. त्यात असे आढळून आले की धार्मिक वातावरणात वाढलेले आणि आठवड्याच्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या कुटुंबात वाढलेले 74 टक्के लोक आजही त्यांच्या बालपणीच्या धर्माशी जोडलेले आहेत.

 

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments