scorecardresearch
Sunday, 22 February, 2026
घरजग‘एकता, अल्पसंख्याकांचे संरक्षण व फॅसिस्ट कुशासनाचा' अंत’: तारिक रहमान

‘एकता, अल्पसंख्याकांचे संरक्षण व फॅसिस्ट कुशासनाचा’ अंत’: तारिक रहमान

बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्या राष्ट्रीय भाषणात, तारिक रहमान यांनी धार्मिक, राजकीय आणि वांशिक एकतेवर भर दिला.

ढाका: बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून आपल्या पहिल्या राष्ट्रीय भाषणात, तारिक रहमान यांनी धार्मिक, राजकीय आणि वांशिक एकतेवर भर दिला. बुधवारी टीव्हीवरील भाषणात 12 मिनिटे बोलताना रहमान म्हणाले, की “बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) सरकारला एक नाजूक अर्थव्यवस्था, कमकुवत प्रशासन रचना आणि बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्था हे सर्व वारशाने मिळाले आहे. याआधीच्या ‘फॅसिस्ट’ सरकारमध्ये भ्रष्टाचार आणि कुशासन हेच प्रामुख्याने दिसून आले. शांतता पुनर्संचयित करणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे ही आमची प्राथमिक कामे असतील. आता देशात लोकशाही, मानवी हक्क, आदर आणि प्रतिष्ठा पुन्हा स्थापित करण्याचा प्रवास सुरू झाला आहे.” असे ते म्हणाले.

“मी देशातील लोकांना एक संदेश देऊ इच्छितो, पक्ष, धर्म, जात, श्रद्धा काहीही असो. पर्वतांमधील रहिवासी असो वा पठारावरील, हा देश आपल्या सर्वांचा आहे. आम्हाला हा देश प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित बनवायचा आहे.” असे प्रतिपादन त्यांनी केले. रहमान म्हणाले की, पक्षाशी संलग्नता किंवा धार्मिक ओळख नव्हे तर नागरिकत्व हे त्यांच्या सरकारचा दृष्टिकोन परिभाषित करेल, हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायांसह मुस्लिम बहुल राष्ट्रात हा एक महत्त्वाचा संकेत आहे. बांगलादेशात भेदभाव आणि सांप्रदायिक तणावाचे आरोप असामान्य नाहीत, 2024 मध्ये विद्यार्थी उठावानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुक्ती युद्धाच्या कथेचा अप्रत्यक्ष संदर्भ देताना, रहमान म्हणाले, की ‘मतदारांनी बीएनपी पक्ष निवडला आणि त्यांना शासन करण्याचा अधिकार दिला. 1971 मध्ये स्वातंत्र्याची घोषणा कोणी केली, याविषयीच्या दीर्घकाळ चाललेल्या वादाचा ते संदर्भ देत होते: शेख मुजीबुर रहमान किंवा तारिक यांचे वडील आणि बांगलादेशचे माजी नेते झियाउर रहमान.

रहमान म्हणाले, की बीएनपीच्या कायदेकर्त्यांनी त्यांच्या पहिल्या संसदीय बैठकीत करमुक्त गाड्या आयात न करण्याचा किंवा सरकारी भूखंड वाटप स्वीकारण्याचा निर्णय घेतला नव्हता.  रमजानच्या दिवशी त्यांनी व्यापाऱ्यांना किंमती वाढवू नयेत असे सांगितले आणि इफ्तार, तरावीह आणि सेहरीदरम्यान अखंड गॅस, पाणी आणि वीज पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी नागरिकांना कचरा करणे टाळण्याचे आवाहन केले, धार्मिक जबाबदारीचा भाग म्हणून काटकसर करण्याविषयीही सांगितले. रमजानला ‘आत्मशुद्धीचा महिना’ असे संबोधत त्यांनी नागरी कर्तव्याला ‘पवित्र पैगंबरांच्या न्यायाच्या आदर्शांशी’ जोडले. रहमान यांनी विद्यार्थ्यांना ‘जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करत असताना किमान एका क्षेत्रात कौशल्य मिळवण्याचे आवाहन केले आणि कौशल्य विकास, प्रतिभा संवर्धन आणि सुधारित रोजगार परिस्थितीसाठी सरकारी मदतीचे आश्वासन दिले.

रहमान म्हणाले, की त्यांचे सरकार सर्व नागरिकांचे प्रतिनिधित्व करेल, ज्यामध्ये बीएनपीला मतदान न करणाऱ्यांचाही समावेश आहे. “प्रत्येकाचा स्वतःचा पक्ष, धर्म, तत्वज्ञान आहे, परंतु राज्य सर्वांचे आहे. या देशात, बांगलादेशी म्हणून, तुम्हाला, मला आणि प्रत्येक बांगलादेशी नागरिकाला समान अधिकार आहेत,” असे ते म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments