scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरजगवानुआतूकडून ललित मोदीचे नागरिकत्व रद्द

वानुआतूकडून ललित मोदीचे नागरिकत्व रद्द

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, फरार उद्योगपती आणि माजी आयपीएल प्रमुख ललित मोदीने वानुआतूचे नागरिकत्व घेतल्यानंतर त्याचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता.

नवी दिल्ली: पॅसिफिक बेट राष्ट्र वानुआतूने सोमवारी ललित मोदी याचे नागरिकत्व जाहीरपणे रद्द केले आहे. यामुळे  इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) माजी अध्यक्ष ललित यांना  मोठा धक्का बसला आहे. मोदीने गेल्या आठवड्यात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला भारतीय पासपोर्ट परत करण्याची विनंती केली होती.  कारण त्याने गुंतवणूक करून नागरिकत्व कार्यक्रमांतर्गत वानुआतूचे नागरिकत्व मिळवले होते. भारतात, तो आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणातील गुन्हेगार असून 2010 मध्ये तो देश सोडून पळून गेला होता.

“भारतीय अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलेल्या आयपीएलच्या माजी अध्यक्षांनी वानुआतूचे नागरिकत्व मिळवल्यानंतर त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्याची इच्छा व्यक्त केली होती,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे (एमईए) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गेल्या आठवड्यात एका सार्वजनिक पत्रकार परिषदेत सांगितले. सोमवारी एका अधिकृत निवेदनात, वानुआतूचे पंतप्रधान जोथम नापट म्हणाले, की त्यांनी नागरिकत्व आयोगाला मोदींचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

“पंतप्रधान म्हणून, आम्ही फरार किंवा गुन्हेगारांना आश्रय देणार नाही. न्याय टाळण्यासाठी आमच्या नागरिकत्व कार्यक्रमाचा वापर करू इच्छिणाऱ्यांना आम्ही अजिबात सहनशीलता दाखवणार नाही. जर कोणाचा हेतू तसा असेल तर त्यांनी अन्य कुठल्या देशात आश्रय घ्यावा.” असे निवेदनात म्हटले आहे. मोदीच्या नागरिकत्व अर्जासाठी इंटरपोल तपासणीसह मानक पार्श्वभूमी तपासणी करण्यात आली होती, परंतु इंटरपोलद्वारे मोदीवर अलर्ट नोटीस मागण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांबद्दल नवीन माहिती समोर आली आहे, असे नापट यांनी स्पष्ट केले. जागतिक पोलिस एजन्सीने ठोस न्यायालयीन पुराव्यांचा अभाव असल्याचे कारण देत दोनदा या विनंत्या नाकारल्या. तथापि, जर या विनंत्या मंजूर झाल्या असत्या तर त्यांनी वानुआतूच्या कठोर इमिग्रेशन प्रोटोकॉल अंतर्गत मोदीचा नागरिकत्व अर्ज आपोआप ब्लॉक केला असता, असे त्यात म्हटले आहे.

“वानुआतूचे नागरिकत्व हा एक विशेषाधिकार आहे, अधिकार नाही आणि नागरिक बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी अर्जदारांकडे कायदेशीर कारणे असणे आवश्यक आहे आणि प्रत्यार्पण टाळण्यासाठी या अधिकाराचा वापर करणे निषेधार्ह आहे असे वानूआतु देशाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

मोदी परकीय चलन नियमांचे उल्लंघन, कर फसवणूक आणि आयपीएल 2009 दरम्यान वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुपसोबत 425 कोटी रुपयांच्या वादग्रस्त टेलिव्हिजन हक्कांच्या कराराच्या चौकशीत आहे. तेव्हा तो फ्रँचायझीचा अध्यक्ष होता. 2010  पासून चौकशी सुरू असताना, मुंबईत अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर अधिकाऱ्यांसोबत फक्त एकदाच चौकशी सत्राला उपस्थित राहिल्यानंतर मोदी भारतातून पळून गेला होता. भारतीय अधिकारी त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने 7 मार्च रोजी त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठी औपचारिक अर्ज केला. कायदेशीर प्रक्रियेनुसार मोदीच्या भारतीय पासपोर्ट परत करण्याच्या विनंतीची समीक्षा केली जात असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

“त्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. विद्यमान नियम आणि प्रक्रियांच्या आधारे त्याची तपासणी केली जाईल. आम्हाला हेदेखील सांगण्यात आले आहे, की त्याने वानुआतुचे नागरिकत्व मिळवले आहे. कायद्यानुसार आम्ही त्याच्याविरुद्ध खटला चालवत आहोत,” जयस्वाल म्हणाले होते.

वानुआतू नागरिकत्व

दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला वानुआतू हा देश नागरिकत्व मिळवण्यासाठी सर्वात परवडणाऱ्या मार्गांपैकी एक आहे, ज्यामध्ये एकट्या अर्जदारांना अंदाजे 155,000 डॉलर्स  (रु. 1.3 कोटी) चे परत न करता येणारे योगदान द्यावे लागते. शांततापूर्ण स्थलांतरासाठी अनेकांना या कार्यक्रमाने आकर्षित केले असले तरी, वानुआतूने स्पष्ट केले आहे की ते या प्रक्रियेचा गैरवापर सहन करणार नाहीत.

वानुआतू सरकारने गेल्या चार वर्षांत त्यांच्या गुंतवणूक करून नागरिकत्व कार्यक्रमाच्या योग्य परिश्रमाच्या पैलूला लक्षणीयरीत्या बळकटी दिली आहे, ज्यामुळे सोमवारीच्या निवेदनानुसार, वानुआतू फायनान्शियल इंटेलिजेंस युनिटने केलेल्या वाढीव छाननीला अपयशी ठरणाऱ्या अर्जांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

“काही वर्षांपूर्वी अंमलात आणलेल्या सुधारित प्रक्रियेत इंटरपोल पडताळणीसह तिहेरी-एजन्सी तपासणी समाविष्ट आहे. आम्ही मान्य करतो की या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीवर असे आरोप आहेत जे अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत आणि आम्ही त्यांना या बाबी सोडवण्यासाठी शुभेच्छा देतो.” असेही त्यात म्हटले आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments