अमेरिकेने बुधवारी संयुक्त राष्ट्र हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन (यूएनएफसीसी) आणि भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह (आयएसए) 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, भारत आणि ब्राझीलसह रशियन तेल खरेदी सुरू ठेवणाऱ्या देशांवर 500 टक्क्यांपर्यंत निर्बंध लादण्याचा अधिकार त्यांना देणाऱ्या कायदेशीर प्रयत्नांना हिरवा कंदील दाखवला आहे, अशी घोषणा सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी बुधवारी केली.
अमेरिकेचे भारतातील नियुक्त राजदूत सर्जिओ गोर, जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आणि मध्य आशियाई प्रकरणांसाठी विशेष दूतदेखील आहेत, ते पुढील आठवड्यात औपचारिकपणे पदभार स्वीकारण्यासाठी भारतात येत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे, की 'जर भारताने रशियासोबत व्यापार सुरू ठेवला, विशेषतः तेलखरेदी सुरू ठेवली, तर ते भारतावरील आयात शुल्क वाढवू शकतात'.
भारताने शनिवारी आपल्या नागरिकांना व्हेनेझुएलाला अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले. मात्र अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी केलेल्या लष्करी कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली नाही.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मंगळवारी दावा केला की, या वर्षाच्या सुरुवातीला बीजिंगने भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली होती. मे महिन्यातील संघर्षादरम्यान इस्लामाबादने नवी दिल्लीविरुद्ध चिनी शस्त्रांचा वापर केला होता.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आज, बुधवारी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी ढाका दौऱ्यावर आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण असताना ही भेट होत आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दावा केला आहे की, 2025 हे वर्ष पाकिस्तान-बांगलादेश संबंधांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरले आहे. अनेक वर्षांच्या राजनैतिक तणावानंतर हा एक दुरावा कमी करणारा क्षण होता, असे त्यांनी म्हटले आहे.
वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानने, संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) आपल्या लष्कराने स्थापन केलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या 'फौजी फाउंडेशन' या समूहामध्ये सुमारे 1 अब्ज डॉलर्सचा हिस्सा खरेदी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी शनिवारी सांगितले की, "ऑपरेशन सिंदूरदरम्यान देशाच्या लष्कराची कामगिरी जगासाठी एक प्रखर संदेश होती, कारण भारताने स्वतःला दक्षिण आशियाचा प्रमुख सुरक्षा पुरवठादार म्हणून घोषित केले होते, आणि हा दावा अन्य महाशक्तींनी स्वीकारला होता".
बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान जवळपास 17 वर्षांच्या, स्वेच्छेने स्वीकारलेल्या विजनवासानंतर गुरुवारी ढाका येथे परतले. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून अशांततेचा सामना करत असलेल्या त्यांच्या देशात एक महत्त्वपूर्ण राजकीय क्षण निर्माण झाला आहे.
बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त रियाझ हमिदुल्ला यांना मंगळवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बोलावले होते. यापूर्वी बांगलादेशने ढाका येथे भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना बोलावल्यानंतर ही घटना घडली आहे.