scorecardresearch
Thursday, 20 August, 2026
घरराजनैतिक

राजनैतिक

‘अमेरिका-पाकिस्तान संबंधांमुळे भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांवर परिणाम ’: केनेथ जस्टर

अमेरिकेचे भारतातील माजी राजदूत केनेथ जस्टर यांच्या मते, 'राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातील अमेरिका-पाकिस्तान संबंधांमधील सुधारणा आणि वाढती जवळीक यामुळे भविष्यात भारताच्या दहशतवादविरोधी आक्रमक प्रतिसादाची तीव्रता काहीशी कमी होऊ शकते'.

अणु-प्रसारबंदी कराराच्या बैठकीपूर्वी, चीन व नाटो यांचे आरोप- प्रत्यारोप

अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या (एनपीटी) 11 व्या आढावा परिषदेपूर्वी देश आपापली भूमिका निश्चित करत असताना, 'चीनने अमेरिकेला अण्वस्त्रधारी नसलेल्या देशांमधील नागरी अणुसुविधांवरील सशस्त्र हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे नाटोने बीजिंगवर पारदर्शकतेशिवाय वेगाने शस्त्रसाठा वाढवल्याचा आरोप केला आहे'.

‘पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यात भारताची भूमिका महत्त्वाची’: राजनाथ सिंग

'पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यात भारत भविष्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो, जरी सध्याची वेळ कदाचित त्यासाठी योग्य नसली तरीही'; असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सांगितले.

इराणमधील चर्चेनंतर असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता

पश्चिम आशियामध्ये शस्त्रसंधीच्या विस्तारासाठी तीव्र वाटाघाटी सुरू असताना, पाकिस्तानचे संरक्षण प्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर तेहरानच्या दौऱ्यानंतर शुक्रवारी वॉशिंग्टनला जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त 'अल जझीरा'ने दिले आहे.

व्यापार करारावरील चर्चेसाठी देशाचे शिष्टमंडळ पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार

वॉशिंग्टनसोबतच्या अंतरिम द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी भारताचे एक शिष्टमंडळ 20 एप्रिल ते 22 एप्रिल या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अमेरिका- इराण युद्धविराम पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यूएई दौऱ्यावर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील शत्रुत्व तात्पुरते थांबल्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 11 व 12 एप्रिल या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर जाणार आहेत.

पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका- इराणमध्ये दोन आठवड्यांची शस्त्रसंधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एक पूर्ण संस्कृती नष्ट होईल' अशी धमकी इराणला दिली होती. ती प्रत्यक्षात उतरण्यास अवघे काही तास उरले असताना, अमेरिका आणि इराण यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे.

हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ 16 भारतीय जहाजे अडकलेली, एकूण 8 जहाजे सुखरूप बाहेर

पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा मार्गांवर तणाव असतानाच, 'ग्रीन आशा' आणि 'ग्रीन साणवी' या भारताचा ध्वज असलेल्या आणखी दोन एलपीजी वाहक जहाजांनी 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' सुरक्षितपणे पार केली आहे. यामुळे अशा जहाजांची एकूण संख्या आठ झाली असल्याची माहिती सरकारने सोमवारी दिली.

पश्चिम आशियातील युद्धसमाप्तीसाठी पाच-कलमी प्रस्ताव, पाकिस्तान-चीनकडून ‘शांतता चर्चेची’ मागणी

पश्चिम आशियामध्ये शांतता पुनर्संचयित करण्यासाठी पाकिस्तान आणि चीनने मंगळवारी पाच-सूत्री उपक्रमाची घोषणा केली. या माध्यमातून, प्रादेशिक संघर्ष थांबवण्यासाठीच्या आपल्या प्रस्तावांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न इस्लामाबाद करत आहे.

दिल्लीहून औषधे नेणाऱ्या इराणी विमानावर अमेरिका- इस्रायलकडून हल्ला

इराणच्या खाजगी मालकीच्या 'महान एअर' या विमान कंपनीचे, मंगळवारी मशहद येथून नवी दिल्लीसाठी उड्डाण नियोजित असलेले एक विमान, रविवारी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात सापडले. हे इराणी विमान बुधवारी सकाळी नवी दिल्लीत पोहोचणार होते, जेणेकरून तेथून मानवतावादी मदत घेऊन ते पुन्हा देशात परत जाऊ शकेल.

‘चीन-रशियाची युती पाश्चात्य जगासाठी प्रबळ धोका’: ऑस्ट्रेलियन थिंक टँक

रशिया आणि चीन यांच्यातील ‘अमर्याद’ भागीदारी आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्थेला नव्याने आकार देण्यास मदत करत आहे, भू-आर्थिक विखंडनाला चालना देत आहे आणि मॉस्कोच्या लष्करी कार्यप्रणालीच्या ज्ञानाच्या आधारे बीजिंगच्या लष्करी आधुनिकीकरणाला गती देत आहे, असे ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांचा ट्रम्प यांच्याशी संवाद, मध्यस्थीचे प्रयत्न सुरू

पश्चिम आशियातील सध्याचा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न इस्लामाबादने तीव्र केले असतानाच, पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला, असे 'फायनान्शियल टाइम्स'ने सोमवारी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.