लाल किल्ला कार स्फोट प्रकरणातील कथित आरोपी हे अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये काम करणारे तीन डॉक्टर्स असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) म्हटले आहे, की ते तपासावर लक्ष ठेवून आहेत आणि तपास संस्थांच्या निष्कर्षांवर आधारित योग्य कारवाई करतील.
भारताने इस्लामाबादमधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आरोपांना स्पष्टपणे आणि तीव्र शब्दांत फेटाळून लावले आहे आणि हे दावे 'निराधार' आणि भ्रामक आहेत, असे म्हटले आहे. पाकिस्तानी नेतृत्वावरही भारताने टीकास्त्र सोडले आहे.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील प्रमुख संशयित डॉ. उमर नबीने 2017 मध्ये श्रीनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) येथून एमबीबीएस पूर्ण केले होते, अशी माहिती मिळाली आहे. सोमवारी रात्री लाल किल्ला परिसरात झालेल्या उच्च-तीव्रतेच्या स्फोटात 36 वर्षीय उमरचा मृत्यू झाल्याचे समजले आहे.
सोमवारी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटानंतरच्या गोंधळाचे वर्णन प्रत्यक्षदर्शींनी केले आहे. रस्त्यावर मृतदेहांचे तुकडे विखुरलेले होते आणि एकामागोमाग अनेक वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती, असे या लोकांनी सांगितले.
लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ लाल दिव्याजवळच्या ज्या पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई आय20 कारमध्ये स्फोट झाला, त्या गाडीचे पहिले दृश्य समोर आले आहे. स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी लाल किल्ल्याच्या पार्किंग लॉटमध्ये घेतलेले हे सीसीटीव्ही फुटेज आहे.
सोमवारी झालेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील स्फोटात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची ह्युंदाई आय 20 ही गाडी पुलवामा येथील एका डॉक्टरशी संबंधित असल्याचे तपासकर्त्यांना आढळले आहे. त्यामुळे मध्य दिल्लीतील हल्ल्याचा आणि त्याच दिवशी फरिदाबादमध्ये झालेल्या छाप्यांचा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
चिली आणि अर्जेंटिना लिथियमसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या शोध आणि उत्खननासाठी भारतीय कंपन्यांसोबत सखोल सहकार्य करण्यास तयार आहेत, असे भारतातील त्यांचे राजदूत जुआन अँगुलो आणि मारियानो कॉसिनो यांनी गुरुवारी सांगितले.
गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, राज्यातील 30 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पथकासह, भारत-पाकिस्तान सीमेजवळील गावांमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांच्या कार्यक्रमावर निघाले आहेत.
मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या नूतनीकरणाच्या भव्य योजनेचा एक भाग म्हणून, अदानी एअरपोर्ट्सच्या नेतृत्वाखालील मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) विमानतळाच्या बंद पडलेल्या टर्मिनल 1ए इमारतीला पाडण्याची तयारी करत आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रिलायन्स समूहाच्या कंपन्यांच्या चौकशीचा एक भाग म्हणून, अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी 132 एकरचा धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी (डीएकेसी) कॅम्पस जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे 4 हजार 462 कोटी रुपये आहे.
मुंबईभोवती ईस्टर्न फ्रीवे, कोस्टल रोड आणि सागरी जोडणीच्या जाळ्यातून रिंग रूट बनवण्याच्या योजनांनंतर, आता शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, शहरातील प्रमुख ठिकाणे आणि रस्ते जोडण्यासाठी शहरात बोगद्यांचे जाळे विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
पक्षातील सर्व फुटलेल्या गटांचे एकत्रीकरण करण्याचे आवाहन गेल्या महिन्यात करणारे ज्येष्ठ अण्णा द्रमुक नेते आणि माजी मंत्री के.ए. सेनगोट्टैयन यांनी बुधवारी माजी अण्णा द्रमुक नेते ओ. पनीरसेल्वम आणि एएमएमके नेते टीटीव्ही दिनाकरन यांच्याशी हातमिळवणी केली.