scorecardresearch
Monday, 6 April, 2026
घरराजकारण

राजकारण

‘संघाला समजून घेणे इतके सोपे नाही’: पंतप्रधान नरेंद्र मोदी

"बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) माझ्या जीवनाला आकार दिला. या संघटनेने प्रथम राष्ट्रीय भावना मनात रुजवली आणि मला जीवनाचा उद्देश मिळवून दिला" असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी लेक्स फ्रिडमन पॉडकास्ट मध्ये केले.

‘भारताचे ‘मीठ’ खाणाऱ्यांनी औरंगजेबाची स्तुती थांबवावी’ : योगी आदित्यनाथ

"भारताचे 'मीठ' खाणाऱ्या लोकांनी त्यांची डीएनए चाचणी करून घ्यावी, म्हणजे त्यांना त्यांचा डीएनए भारतीय असल्याचे आढळेल", असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी लखनौ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर आणि पंचजन्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हटले.

भाजप केंद्र सरकारविरुद्धचे ‘आप’ काळातील खटले रद्द करणार, केंद्र-दिल्ली संबंध सुधारणार?

राष्ट्रीय राजधानीत 'आप'च्या पहिल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच कायदेशीर संघर्ष सुरू झाला. केंद्र आणि उपराज्यपालांविरुद्ध किमान अर्धा डझन खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

किरोडी लाल बंड, भ्रष्टाचाराचे आरोप यांमुळे राजस्थान भाजप चर्चेत

गेले काही महिने राजस्थान भाजप अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत आहे. विरोधी पक्ष याचा फायदा उठवत आहेत.

उत्तर तेलंगणावर भाजपची पकड मजबूत, आता हैदराबाद नगरपालिका निवडणुकांवर लक्ष

2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पराभव पत्करल्यानंतर भाजप तेलंगणात आघाडीच्या विरोधी शक्ती म्हणून स्वतःला स्थान देण्याचा प्रयत्न करत असताना, एमएलसीच्या ताज्या निवडणुकांचे निकाल आले आहेत.

निलंबित आमदार अबू आझमींचा राहुल सोलापूरकरांवर निशाणा

निलंबित आमदार अबू आझमींनी राहुल सोलापूरकर यांच्या शिवाजी महाराजांवरील वक्तव्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'मी सरकारला विचारू इच्छितो की राज्यात दोन वेगवेगळे कायदे आहेत का? अबू आझमींसाठी एक, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरांसाठी दुसरा?'

निवडणुकीपूर्वी सर्व भाजपविरोधी पक्षांना संघटित करण्याचे ‘द्रमुक’चे प्रयत्न

सर्वपक्षीय बैठकीमुळे, द्रमुक भाजपला एकाकी पाडण्याची आणि निवडणुकीपूर्वी तमिळनाडूतील पक्षांना एकत्र करण्याची संधी पाहत आहे. केंद्राच्या सीमांकन प्रस्तावाच्या निषेधार्थ 5 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत स्टॅलिन यांनी राज्यातील सर्व पक्षांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. 2026 च्या निवडणुकीसाठी हा मुद्दा सर्वोच्च अजेंडा असेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

धनंजय मुंडे: अजित पवार यांचे सहकारी ते आता महायुतीचे पहिले ‘बळी’

मुंडे यांचे गृहजिल्हा बीड येथील भाजप सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर मंगळवारी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसच्या सूचनेनंतर प्रवक्त्या शमा मोहम्मद यांच्या रोहित शर्मावरील टीकेच्या पोस्ट्स डिलीट

एक्सवरील त्यांच्या आता हटवलेल्या पोस्टमध्ये, शमा मोहम्मद यांनी शर्माच्या कर्णधारपदाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याची तुलना सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गजांशी केली.

महायुतीच्या वादादरम्यान ‘सामना’मधून फडणवीसांची प्रशंसा

शिवसेनेने (उबाठा) 'सरकारी प्रशासन स्वच्छ केल्याबद्दल' फडणवीस यांचे कौतुक केले, तर शिंदे यांना धारेवर धरले. 

महापालिका निवडणुकांपूर्वी पाठिंबा वाढवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ‘कृती आराखडा’

शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिका निवडणुकीपूर्वी पाठिंबा मिळवण्याची योजना आखली आहे. त्याची सुरुवात शिंदे यांच्या गृहराज्यातून होईल.

इतिहासकारांच्या ‘छावा’वरील टीकेमुळे पुन्हा ब्राह्मण-मराठा वादाची ठिणगी

कोल्हापूर येथील इतिहासकार इंद्रजित सावंत यांचा दावा आहे की त्यांना प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने धमकावले होते. त्यांनी फेसबुकवर त्या कॉलचे रेकॉर्डिंग शेअर केले. कोरटकर यांनी ते स्वतः असल्याचे नाकारले आहे.