'आप'ने दिलेल्या आश्वासनांची यादी भाजप तयार करत आहे, पण ती पूर्ण झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे. राजधानीतील महिला मतदारांसाठी विशेष योजना राबविण्याचे नियोजन आहे.
मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपी रविवारी मणिपूरमधील बीरेन सिंग यांच्या सरकारमधून बाहेर पडले आणि राज्यात सामान्य स्थिती पुनर्संचयित करण्यात सरकार पूर्णपणे अयशस्वी झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाच वेळा आमदार राहिलेल्या नवाब मलिक यांनी ‘द प्रिंट’शी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयाबद्दल आणि महायुतीच्या मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांनी केलेल्या जातीय आरोपाबाबतही चर्चा केली.
वायएसआरसीपी प्रमुखांचा दावा आहे आंध्रप्रदेश पोलिसांकडून 680 नोटिसा जारी करण्यात आल्या असून पक्ष समर्थकांवर 147 खटले दाखल केले आहेत आणि 49 जणांना अटक झाली आहे. आंध्रप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांना धमक्या आणि शिवीगाळ यांचा सामना करावा लागत आहे.
अभिनेते-राजकारणी विजय यांनी गेल्या महिन्यात विक्रवंडी येथे तमिलगा वेत्री कळघमची ‘(तामिळनाडू व्हिक्टरी फेडरेशन’) पहिली राजकीय परिषद आयोजित केलेली असताना बहुतेक गर्दी ही तरुणांचीच होती. त्यामुळे प्रस्थापित पक्षांनीही याची दखल घेतली.
जयललिता यांच्या इस्टेटमध्ये 2017 मध्ये झालेल्या चोरी-हत्याकांड प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप इडाप्पडी के. पलानीस्वामी यांच्यावर आहे. मद्रास हायकोर्टाने आता मुख्य संशयिताच्या भावाला, ईपीएस यांचा या खटल्याशी संबंध जोडल्याबद्दल विधानासाठी दंड ठोठावला आहे.
2016 आणि 2021 मध्ये भाजपचे उमेदवार या जागेवर दुसऱ्या क्रमांकावर आल्याने भाजपला यावेळीही विजयाची आशा आहे. सी. कृष्णकुमार, भाजपचे प्रदेश सरचिटणीस, पलक्कड येथे त्यांचे उमेदवार आहेत.
भाजपेतर पक्षांपेक्षा स्वतःला वेगळे दाखवण्यासाठी , मसुदा ठरावात असे नमूद करण्यात आले आहे, की सीपीआयएमने एक वैचारिक ध्येय म्हणून समाजवादावर जोर देणे अत्यावश्यक आहे.
झारखंडसाठी जाहीरनामा जारी करताना अमित शहा म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यास जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र सारणा कोडचा विचार केला जाईल. पण आरएसएसला जेएमएम समर्थित मागणी 'बोगस' वाटते.
काँग्रेसने 'पक्षपातीपणा'चा आरोप करत शुक्ला यांना काढून टाकण्याची विनंती केल्यानंतर हे घडले आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डीजीपी 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणातील एक आरोपी होत्या.