बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सर्व त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाने या महिन्यात आपली प्रशासकीय रचना मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कुरुबा या मेंढपाळ समुदायाचा अनुसूचित जमाती (एसटी) श्रेणीत समावेश करण्याचा आग्रह धरला आहे. या समुदायाशी ते संबंधित आहेत. यामुळे राज्यातील आधीच गुंतागुंतीच्या जातीय गतिशीलतेला आणखी धक्का बसला आहे.
निवडणूक आयोगाने अंबुमणी यांना पीएमके प्रमुख म्हणून 'मान्यता' दिल्यानंतर, रामदास गट निवडणूक आयोगाकडून औपचारिक सुनावणीची मागणी करणार आहे. अंबुमणी यांच्या समर्थकांनी सोमवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यास परवानगी देणारे निवडणूक आयोगाचे पत्र प्रसिद्ध केले, ज्यामुळे पिता-पुत्रांच्या वादात नवीन वाद निर्माण झाला. रामदास गटाने दावा फेटाळला.
भांडवली बाजारातील ज्येष्ठ उद्योजक अनिश दमानिया यांना या महिन्याच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस सरकारकडून त्यांच्या 'थिंक टँक महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन' (मित्रा) मधील आर्थिक दिग्गजांच्या टीमचा भाग होण्यासाठी आमंत्रण मिळाले होते, व हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला.
केरळच्या वायनाड मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकलेल्या काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वद्रा त्यांच्या मतदारसंघात जास्त वेळ घालवता यावा, म्हणून वायनाडमध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. वायनाडमधील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'द प्रिंट'ला सांगितले, की प्रियांका यांना मालमत्ता खरेदी करून जिल्ह्यात स्थलांतरित होण्यास रस आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मोठे आव्हान निर्माण होत आहे.
भाजपच्या नायब सैनी सरकारने लाडो लक्ष्मी योजनेअंतर्गत 23 वर्षांवरील पात्र महिलांना दरमहा 2,100 रुपये आर्थिक मदत देण्याची अधिसूचना जारी केली आहे, ज्यामुळे गेल्या वर्षी दिलेल्या निवडणुकीच्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे. ही योजना 25 सप्टेंबरपासून लागू होईल.
काँग्रेसने माजी सीपीआय(एम) नेते प्रसेनजीत बोस यांना सामील केले. संविधानाच्या रक्षणासाठी राहुल गांधींच्या लढाईला बळकटी देण्यासाठी ते काँग्रेसमध्ये सामील होत असल्याचे ते म्हणतात. तसेच पंतप्रधान कार्यालयात ममतांसाठी कोणतीही जागा रिक्त नसल्याचेही ते म्हणतात.
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (प्रमुख) मोहन भागवत यांचा कार्यकाळ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासातील सर्वात परिवर्तनकारी काळ मानला जाईल", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी केले.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) नेपाळमधील चालू घडामोडींवर भाष्य करणे टाळण्याचे निर्देश त्यांच्या सर्व नेत्यांना, मंत्र्यांना व सोशल मीडिया हँडल्सना दिले आहेत.
राजस्थान बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयक, 2025 मध्ये जबरदस्तीने आणि बनावट धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कलमे आणि जन्मठेपेची शिक्षा याची तरतूद आहे. राजस्थान विधानसभेत मंगळवारी मंजूर झालेल्या विधेयकानुसार, वडिलोपार्जित धर्मात परत जाणे धर्मांतराच्या व्याख्येत समाविष्ट नाही.
छत्तीसगडमध्ये गेल्या महिन्यात दोन कॅथोलिक नन्सना अटक झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाने केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ख्रिश्चन समुदायाशी संपर्क वाढवला आहे. भाजप नेत्यांच्या मते, पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर ख्रिश्चन समुदायात घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन मंगळवारी भारताचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला.