scorecardresearch
Thursday, 20 August, 2026
घरराजकारण

राजकारण

आंध्रप्रदेशच्या जनसेना पक्षाकडून सदस्यत्व अभियान सुरू करण्याची तयारी

तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) ने आपले पक्ष सदस्यत्व अभियान संपवल्यानंतर आता मित्रपक्ष जन सेना पक्ष (जेएसपी) स्वतःचे सदस्यत्व अभियान सुरू करण्याची तयारी करत आहे. जेएसपीच्या सूत्रांनी सांगितले की, प्रस्तावात असे म्हटले आहे, की नवीन सदस्यांना अपघात विमा आणि इतर अनेक फायदे मिळतील.

एआय शिखर परिषदेच्या काँग्रेसच्या निषेधावर पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान काँग्रेसच्या युवा शाखेच्या सदस्यांनी 'शर्टलेस' निदर्शने केल्यानंतर काही दिवसांनी 'काँग्रेसने राष्ट्रीय कार्यक्रमाचे उल्लंघन केल्याचा' आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

राजस्थान विधानसभेत भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान

सोमवारी राजस्थान विधानसभेत भाजप आमदार बहादूर सिंह कोळी यांनी केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले. त्यांनी भजनलाल शर्मा सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे मुलगा (छोरा) आहे तर त्याधीच्या काँग्रेस सरकारचा अर्थसंकल्प एखाद्या मुलीप्रमाणे (छोरी) होता, अशा अर्थाचे विधान केले.

सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची शक्यता फेटाळली

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) दोन्ही गटांमधील विलीनीकरणाच्या संभाव्य अनिश्चिततेदरम्यान, दोन्ही गटातील नेत्यांनी एकत्र येण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

‘टिपू सुलतान’वरून पुन्हा वादंग, काँग्रेसचा भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप

मुघल सम्राट औरंगजेबानंतर आता 18 व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतानवरून आता राज्याच्या राजकारणात वादंग सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची तुलना टिपू सुलतानशी केल्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

तेलंगणा शहरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व

शुक्रवारी रात्री जाहीर झालेल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेस आणि राज्य सरकारमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. शुक्रवारी रात्री जाहीर झालेल्या निकालांमध्ये काँग्रेसने बहुसंख्य नगरपालिका आणि महानगरपालिका जिंकल्या आहेत.

कर्नाटक काँग्रेस आमदारांच्या ‘परदेश अभ्यास दौऱ्या’वरून राजकीय वाद

पशुपालन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी 14 काँग्रेस आमदारांच्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 15 दिवसांच्या दौऱ्याच्या योजनेतून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक सरकारच्या खर्च आणि प्राधान्यांवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मुंबई महापौरांसाठीच्या बंगल्याचे नूतनीकरण सुरू

तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर, भायखळा येथील महापौर बंगला मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे यांच्यासाठी सजवला जात आहे. बंगल्याचे आता नूतनीकरण आणि देखभाल सुरू आहे आणि बीएमसीच्या मते, तो लवकरच तयार होईल.

केरळ सरकारतर्फे 800 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण

केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारने या आठवड्यात मोठ्या रकमेचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले आहेत. केरळमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असताना बुधवारी मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी 800 कोटी रुपयांच्या उपक्रमांचे उद्घाटन केले.

महाविकास आघाडीचे भवितव्य अनिश्चित? ठाकरे शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते विरोधी अजित पवार गटात विलीन होण्यास उत्सुक आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीत ग्रामीण भागावर भाजपची पकड मजबूत

बारापैकी आठ जिल्हा परिषदा आणि 125 पैकी 51 पंचायत समिती निवडणुकीत आघाडी घेत, भाजप महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष राहिला आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते, की पक्ष केवळ शहरी भागातच नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातही तितकाच मजबूत आहे.

काँग्रेसप्रणित ‘यूडीएफ’चा ‘सीपीआयएम’वर उजव्या विचारसरणीकडे झुकल्याचा आरोप

केरळमधील आगामी निवडणुकांसाठी आपल्या प्रचाराला सुरुवात करताना, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने सत्ताधारी सीपीआय(एम) पक्षावर 'मतांसाठी जातीय ध्रुवीकरण करण्याकरिता संघ परिवाराच्याच मार्गावर चालत असल्याबद्दल' जोरदार टीका केली.