scorecardresearch
Sunday, 25 October, 2026
घरराजकारणहल्द्वानी ‘शुद्धीकरण’ प्रकरणी खर्गे यांची एफआयआरची मागणी

हल्द्वानी ‘शुद्धीकरण’ प्रकरणी खर्गे यांची एफआयआरची मागणी

काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहून हल्दवानी येथील रामलीला मैदानावर 8 ऑगस्टच्या जाहीर सभेनंतर ‘शुद्धीकरण’ समारंभात सहभागी असलेल्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) मागितला आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहून हल्दवानी येथील रामलीला मैदानावर 8 ऑगस्टच्या जाहीर सभेनंतर ‘शुद्धीकरण’ समारंभात सहभागी असलेल्यांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) मागितला आहे. 2 सप्टेंबरच्या पत्रात, खर्गे यांनी नड्डा यांना 13 ऑगस्ट रोजी राज्यसभेत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली की या प्रकरणाची चौकशी केली जाईल, आणि जबाबदारांवर कारवाई केली जाईल. या घटनेला 24 दिवस उलटले आहेत, असे सांगत कारवाईच्या दिरंगाईवर आता खर्गे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“मला आश्चर्य वाटते, की या घटनेला 24 दिवस उलटूनही हल्दवानीमध्ये हे निंदनीय कृत्य करणाऱ्या संबंधित संस्था आणि व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही,” असे त्यांनी लिहिले. रॅलीच्या ठिकाणी जे घडले, ते समानता आणि सन्मानाच्या घटनात्मक मूल्यांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. रामलीला मैदानाच्या ठिकाणी मी ज्या रॅलीला संबोधित केले होते, त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या भावनेच्या आणि मानवी मूल्यांच्या विरुद्ध पद्धतीने शुद्धीकरण करण्यात आले.” असे खर्गे म्हणाले.

“आंबेडकरांनी महाडच्या टाक्यातून पाणी प्यायल्यानंतर त्यांना विरोध करणाऱ्या लोकांनी गोमूत्र आणि शेणाचा वापर करून मंत्रोच्चार करत शुद्धीकरणाचा विधी केला. शुद्धीकरणाची जातीय प्रक्रिया केवळ मंत्रोच्चार करून किंवा हवन करून पवित्र होत नाही.” असे प्रतिपादन त्यांनी केले. या घटनेकडे आपण केवळ आपला अपमान म्हणून पाहत नाही, असे खर्गे यांनी स्पष्ट केले. “हा मुद्दा माझ्या वैयक्तिकरित्या किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदापुरता मर्यादित नाही; तो कोट्यवधी लोकांच्या भावनांशी व्यापकपणे जोडलेला आहे ज्यांना दररोज या क्रूर वास्तवाचा सामना करावा लागतो,” ते म्हणाले.

खर्गे यांनी नड्डा यांना संसदेतील त्यांच्या आश्वासनाचे पालन करण्यास सांगितले आहे आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना समारंभात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी 8 ऑगस्ट रोजी हल्दवानी येथील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या सभेला संबोधित केल्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर कार्यक्रमस्थळी शुध्दीकरण सोहळा पार पडला. त्यानंतर खरगे यांनी 13 ऑगस्ट रोजी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. या भागाला ‘दुर्भाग्यपूर्ण’ संबोधून नड्डा म्हणाले की, ” भाजप अशा कृत्यांचे समर्थन करत नाही, या प्रकरणाची तपासणी केली जाईल आणि दोषींना शिक्षा केली जाईल.” मात्र काही दिवसांनंतर उत्तराखंड भाजपचे प्रमुख महेंद्र भट्ट यांनी ‘शुद्धीकरण’चा बचाव केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेतली आणि समारंभाला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आणि त्यात जातीय भेदभाव दिसून आल्याचा आरोप केला. जातीय भावना दुखावल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेत्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसने राहुलविरोधात दाखल केलेल्या एफआयआरविरोधात देशभरात निदर्शने केली.

सूत्रांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, की खर्गे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या बाजूने उभे न राहिल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments