scorecardresearch
Thursday, 20 August, 2026
घरदेश

देश

एनआयएकडून दिल्ली स्फोटातील सुसाईड बॉम्बरच्या प्रमुख सहकाऱ्याला अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनबाहेर 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात वापरल्या जाणाऱ्या ह्युंदाई आय 20 च्या मालकाला अटक केली, असे एजन्सीच्या प्रवक्त्याने सांगितले.

सॅंटियागो मार्टिन यांचा मुलगा जोस नवीन राजकीय पक्ष सुरू करणार

भारतातील लॉटरी किंग सॅंटियागो मार्टिन यांचे पुत्र आणि उद्योगपती जोस चार्ल्स मार्टिन डिसेंबरमध्ये एक राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. याची औपचारिक घोषणा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात केली जाईल आणि पुद्दुचेरी हे पक्षाचे मुख्यालय असेल.

‘काँग्रेसचे पतन हा ‘इंडिया’ आघाडीतील सर्वात मोठा अडथळा’!

काँग्रेसला पुन्हा मजबूत केल्याशिवाय, राष्ट्रीय पातळीवर भाजपला आव्हान देता येणार नाही. मोदींचा पक्ष वाढत आहे, आणि तोही जवळजवळ पूर्णपणे काँग्रेसच्या अधोगतीच्या जीवावर!

बिहारमध्ये भाजप-जदयूचा धुमाकूळ; निर्णायक विजयाकडे वाटचाल

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) निर्णायक विजयाकडे वाटचाल करत आहे. विरोधी पक्षांच्या महाआघाडीवर मात करत आहे आणि नितीश कुमार विक्रमी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार बनण्याकडे वाटचाल करत आहेत.

भाजपच्या देवयानी राणा यांचा नागरोटा पोटनिवडणुकीत विजय

जम्मू आणि काश्मीरच्या नागरोटा पोटनिवडणुकीत भाजपच्या देवयानी राणा विजयी झाल्या आहेत. त्यांनी जम्मू आणि काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टी (जेकेएनपीपी) चे अध्यक्ष आणि माजी शिक्षण मंत्री हर्ष देव सिंह यांचा 24 हजार 600 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.

प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात संघर्ष

मतदान सल्लागार व राजकारणी प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला (जेएसपी) मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपले अस्तित्व दाखविण्यास संघर्ष करावा लागत असल्याने त्यांना निराशेलाच सामोरे जावे लागत आहे. बिहारच्या 243 विधानसभा जागांपैकी जेएसपीने 238 जागांवर निवडणूक लढवली.

बिहार निवडणूक निकाल : ‘जदयू’चे अनंत सिंह मोकामा येथून आघाडीवर

शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार मोकामा येथील जद(यू) उमेदवार सिंग हे त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी 'राजद'च्या वीणा देवी यांच्यापेक्षा 11 हजार 20 हून जास्त मतांनी आघाडीवर होते.

अल-फलाह विद्यापीठाकडून दिल्ली स्फोटाशी संबंध असल्याच्या आरोपाचे खंडन

लाल किल्ला कार बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयितांपासून अल-फलाह विद्यापीठाने स्वतःला अलिप्तच ठेवले आहे. त्यांनी बुधवारी म्हटले, की विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये अधिकृत पदावर असताना केलेल्या कारवायांव्यतिरिक्त त्यांच्या इतर कोणत्याही हालचालींशी त्यांचा कोणताही संबंध नाही.

स्फोटाच्या एक आठवडा आधी साथीदाराच्या अटकेनंतर उमर नबी फरार

लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख संशयित डॉ. उमर यू. नबी, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या सुमारे एक आठवडा आधी फरिदाबादमधील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर या त्याच्या कामाच्या ठिकाणहून पळून गेला होता, अशी माहिती मिळाली आहे.

तामिळनाडूच्या एनटीके पक्षाची टीव्हीकेला टक्कर देण्यासाठी प्रति-रणनीती

अभिनेता-राजकारणी विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम हा पक्ष तामिळनाडूतील बदलाच्या चाहत्यांना आकर्षित करत असताना, नाम तमिलर कच्ची (एनटीके) चे प्रमुख सीमन यांनी जात आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून त्यांच्या पक्षाचा दृष्टिकोन पुनर्संचयित करून एक प्रति-रणनीती सुरू केली आहे

अल-फलाह मेडिकल स्कूलमधील तीन डॉक्टरांचा दिल्ली स्फोटाशी संबंध, चौकशी सुरू

लाल किल्ला कार स्फोट प्रकरणातील कथित आरोपी हे अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चमध्ये काम करणारे तीन डॉक्टर्स असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) म्हटले आहे, की ते तपासावर लक्ष ठेवून आहेत आणि तपास संस्थांच्या निष्कर्षांवर आधारित योग्य कारवाई करतील.

पाकिस्तानच्या आरोपांना भारताचे तीव्र शब्दांत प्रत्युत्तर

भारताने इस्लामाबादमधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आरोपांना स्पष्टपणे आणि तीव्र शब्दांत फेटाळून लावले आहे आणि हे दावे 'निराधार' आणि भ्रामक आहेत, असे म्हटले आहे. पाकिस्तानी नेतृत्वावरही भारताने टीकास्त्र सोडले आहे.