ट्रम्प हा बंडखोर नेता आहे. त्याच्या दृष्टीने सनदी सेवक (करिअर सिव्हील सर्व्हंटस) हे ‘खलनायक’ आहेत. तर मोदींसाठी मात्र सनदी सेवक हे सातत्यपूर्ण बदल आणि निष्ठेचे प्रतीक आहे.
संपूर्ण जगाचे लक्ष मुक्त व्यापार, जागतिकीकरण, युक्रेन युद्ध आणि गाझातील संघर्षाकडे लागले आहे. त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र प्रसाराविरोधातील विचारालाच मूठमाती दिली आहे. त्यामुळे, अण्वस्त्रे युद्ध प्रतिबंधक म्हणून पुन्हा नावारूपाला येत आहेत.
अदृश्य सरकारी हस्तक्षेप (डीप स्टेट) हा आता जगातील लोकशाही राष्ट्रांमधील षड्यंत्र सिद्धांताचा आधार बनला आहे. याचा पहिला फटका अमेरिकेला बसला. आता भारतातही याचा हस्तक्षेप वाढीला लागला असून, अनेक युरोपीय लोकशाही राष्ट्रेही याच्या टप्प्यात आहेत.
केजरीवाल आणि आम आदमी पक्ष उद्ध्वस्त झाले आहेत, पण संपलेले नाहीत. पंजाबमध्ये त्यांचे अजूनही मोठे प्रस्थ आहे, दिल्लीत महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि पराभवानंतरही 43 टक्के मते आहेत.